University Song
Last Updated On Sep 20 2007 5:44PM
[ Printable Version ]विदयापीठ गीत

 

गीत आमुचे आकाशाचे गीत आमुचे सागऱाचे

इतिहासाचे जनामनाचे गीत आमुचे जागऱाचे

अंभगाचे ओवीचेही

मायबोलीचे माहेर

वा-यातही मराठीचे

दिवे लखख घरोघऱ

संत महंताचे विरागी गीत आमुचे वादळाचे

तंतु तंतु संघर्षाचा

पैठणीत भिजलेला

नक्षीतच पक्षी पक्षी

विजयाचा विणलेला

उदयाचे सोनपहाटेचे गीत आमुचे उजेडाचे

प्रज्ञेचा सूर्य़ नवा

शबद उजळुण गेला

समतेचा संगऱाचा

अथ ठाळूण गेला

विराट विशाल संसकुतीचे गीत आमुचया जीवणाचे

 

 

फ. मु. शिंदे